Sunday, May 8, 2011

|| हे कविता माये ||

हे कविता माये ,
सगळ्यांचे भले कर..!

इथे खुपजण पोटुशी आहेत ....
त्यांचे भले कर...!
कुणाच्या पोटी प्रश्न दे..
तर दुसऱ्या पोटी उत्तर दे..!
तिसरयाला ते चुकीचे ठरवू दे!!
चौथ्या पोटी हे सगळे पटवून दे ..!
कुणी राग नावाच्या पोराला जन्म दिला
तर दुसऱ्या पोटी शान्ति नावाची पोरगी दे..!

इथे खुपजण लग्नाळु आहेत ..
सदाहास नावाच्या सगळ्या पोरांना ...
करुणा नावाच्या पोरींची ओळख करुन दे...!
सगळ्याना थोड़ - थोड़ तोलून दे..
जमलच तर एकमेकात माळून दे..!

इथे काहीजण स्वप्नाळू आहेत ..
काहींची स्वप्न लवकर पूर्ण कर..
काहींची मोठी करत.. अपूर्ण ठेव..
निराश लोकांना त्यांना भेटव..!
यांची निराशा लवकर संपव ...!

इथे खुपजण धर्मांध आहेत ..
त्यांना डोळस कर ....
'तो' नेहमीच तुमच्यासाठी लढायला येतो म्हणावे ..
तुम्ही 'त्याच्यासाठी' लढु नका म्हणावे ...!

इथे खुपजण ओळख हरवले आहेत ..
आपोआप चांगदेव झाले आहेत..!
तू कुणाला तरी मुक्ताई बनव..
तिच्या हातून पासष्टी लिहून दाखव ..

इथे खुपजण काव्याळु आहेत ..
कविता लवकर उतरवून घे ..
त्या सगळयांना कळु दे..
अर्थ त्यांचे थोड़े फार तरी वळु दे..!!

मनातला सगळे तुझ्या रुपाने उतरु दे..!
सगळे सगळे तुझ्या रुपात सामव..
अन खुप सारे विषय अजुन..
असे थोडक्यातच संपव..!!!!!

विनायक
९ फेब २००९

No comments:

Post a Comment

उत्तान कविता

आधी कविता लक्षात रहायची..एकदम बरोबर ठिकाणी सापडायची.. तीच्या बटांत मिळायची..तर कधी खळीत धडपडायची.. आधी कविता मानेला हिसका देउन मस्त ...