कृष्णा ,
मी समजू शकतो तुझी अवस्था आज !
जेव्हा लक्षात येतं
कंठशोष करून शंख तर फुंकायचा आहे आपणच ,
आणि लढायचं पण नाही ,
तसंच ,
मला आलंय लक्षात ,
सखा सखा म्हणुन आयुष्यभर सोबत असलेल्या माणसाने
अचानक पाठ दाखवण्याचे प्रसंग झेलले ,
की गीता आपोआप झरु लागते बघ !
शिशुपालीय वृत्तींना ठेचावं लागतं
अगदी भर सभेत,
हेही नीट कळलंय मला !
राधेला बासरी दॆउन भुलवत मार्गी लावण्याची
निकडही मी समजु शकतो . . !
निकडही मी समजु शकतो . . !
पुन्हा गोकुळात न जाण्याचा निग्रह
मी बाणवला आहे अंगी
अगदी समजावून घेऊन !
केसात हात घातला तेव्हा न येता
पदरास हात लावताच येण्यातला उशीरहि
मी समजाऊन घेतला आहे आपसुक !
पण
कर्णाला द्रौपदी देऊ करणं अजूनही मी समजू शकलो नाहि
अनेक अक्षौहिणी सैन्य उध्वस्त करुनसुद्धा !!!!