Saturday, September 17, 2011

शेजारती


जरा साजरे पाप करण्या निघालो..
बरा कोरडा राहुनी मी बुडालो..
उजेडात मी गोजिरे पुण्य केले..
निशा पुर्ण होता बरे धन्य झाले..

असा पावसाळा उगा जाइ वाया..
नको सोवळे पाळुनी सोडु काया..
सखे सोहळे चांदण्याचे तुला घे..
कळ्या माळुनी मोग-याच्या मला दे..

तुझे सायली ओठ गाती अभंगे..
मनी आत शेजारती नित्य रंगे ..
किती वाटुनी गोपिकां कृष्ण राही
तरी अंतरी कृष्ण राधेस पाही..

असा का बरे त्रास होतो जिवाला.. ?
इथे कोण आहे सहारा कुणाला?
कसा हा पसारा सरावा उरावा?
कुणी आवरावा कुणी निस्तरावा?



विनायक 
१६/१७ सप्टेंबर २०११

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...