Sunday, May 17, 2020

​कधी कधी न? काहीच बोलू नये..



कधीकधी नं ? काहीच बोलू नये..
नुसत्या शांततेलाच थोडे बोलू द्यावे..
शांत , अगदी स्तब्ध राहून...
 हृदयात खुप काही हलू द्यावे ....

या शांततेत कधी मग,
पावसाला द्यावा थोड़ा चान्स ,
रिमझिम धुन ऐकत मग,
फुलू द्यावा अखंड रोमान्स ..

कधीतरी मग वारा ,
नुसताच वाहू द्यावा ,
अंगावरचा काटा मग
तसाच राहु द्यावा ...!

आधीच कललेल्या उन्हाला ,
थोडं अजुन कलू द्यावं  
वाट पहायचं दु:ख मग,
थोड अजुन सलू द्यावं !

पाहू द्यावं स्वप्न कधी 
उघड्या डोळ्यांना ,
अन दोन शब्द द्यावेत 
पापणीच्या चार कळयांना !

कधी हळुवार फुंकर घालून ,
मुठीतल्या म्हातारीला थोडं उडु द्यावं 
तर कधी प्रेमवेड्या सखीला,
घट्ट मिठीत मनसोक्त रडू द्यावं  ..

स्पर्शांचे  अर्थ मग 
श्वासांना कळु द्यावेत..
अर्थहीन श्वास मग 
वेड्या लयीत वळु द्यावेत ....!

कधी कधी हे सगळं घडेल
 असं स्वप्न पडू  द्यावं 
स्वप्नांत का होईना 
असं स्वप्नवत घडू द्यावं ..!

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...