तुझं बरं चाललं आहे .. माहीत आहे मला !
असंच एकदा फिरत धूमकेतूसारखा मी येईन ..
तुझ्या गावी , तुझ्या घरी !
मला खरंतर पुढच्या प्रवासाला निघायचं आहे ,
पण तरीही तू "थांब" न म्हणता मी थांबेनच त्या रात्री ..
तुझ्या सोबत कॉफी घेण्यासाठी..
जेवण झाल्यावर तू ठेवतेच कॉफी अगदी न विचारता ..
आपण तुझ्या कौलारू घराच्या पायरीवर बसू
होय उंबरठ्याच्या बाहेर पण कुंपणाच्या बाहेर नाही..
एकेका पायरीवर बसू आपण कॉलेजला होतो तसे..
मी खालच्या पायरीवर आहे आणि तू अशा ठिकाणी जिथून तुला अजूनही टपली मारता येते मला ,
होय उंबरठ्याच्या बाहेर पण कुंपणाच्या बाहेर नाही..
एकेका पायरीवर बसू आपण कॉलेजला होतो तसे..
मी खालच्या पायरीवर आहे आणि तू अशा ठिकाणी जिथून तुला अजूनही टपली मारता येते मला ,
अगदी कॉलेजमध्ये मारायचीस तशी !
पहाटे निघणार आहेच मी,
पण ही गप्पांची रात्र संपूच नये असं वाटतं आहे..
मध्यरात्रीच्या पल्याड पण पहाटेच्या थोडं अल्याड ..
तुझ्या नवऱ्याला जाग येते ,
तो आपल्याला कॉफी करुन आणतो आणि स्वतः ही घेतो ,
पहिल्या sip ला आपण एकमेकांना पाहतो..
तू शिकवलं आहेस त्याला माझ्या सारखी कॉफी बनवायला , हे तुला मलाच कळतं !!
तू शिकवलं आहेस त्याला माझ्या सारखी कॉफी बनवायला , हे तुला मलाच कळतं !!
मी तुला thank you म्हणतो !
तो तुला कुशीत घेऊन मला thank you म्हणातो , नजरेतून !
अर्थात तुला ते कळत नाही , पण मला कळतं तो का thank you म्हणतो आहे ..
मीही खरंच खूप चांगलं काम केल्यासारखं स्वीकारतो ते ,
कॉफी मग हलकासा उंचावत ..!
पहाटेला तांबडं उगवलं कि , मग आपले हे सगळे एकमेकांचे
thank you घेऊन आपण सगळेच प्रवासाधीन होतो एका नव्या पहाटेच्या ,
पहाटेला तांबडं उगवलं कि , मग आपले हे सगळे एकमेकांचे
thank you घेऊन आपण सगळेच प्रवासाधीन होतो एका नव्या पहाटेच्या ,
the storm which was brewing between us .. मागे ठेऊन !
अचानक लक्षात येतंच आपल्याला we did brew a wonderful कॉफी , didn't we ?
खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉग नक्की भेट द्या.
ReplyDeleteJIo Marathi