Wednesday, July 22, 2020

brewed Coffee

तुझं बरं चाललं आहे .. माहीत आहे मला !
असंच एकदा फिरत धूमकेतूसारखा  मी येईन .. 
तुझ्या गावी , तुझ्या घरी !

मला खरंतर  पुढच्या प्रवासाला  निघायचं आहे ,
पण तरीही  तू "थांब" न म्हणता मी थांबेनच त्या रात्री .. 

तुझ्या सोबत कॉफी घेण्यासाठी.. 
जेवण झाल्यावर तू ठेवतेच कॉफी  अगदी न विचारता .. 

आपण तुझ्या कौलारू घराच्या पायरीवर बसू
होय उंबरठ्याच्या  बाहेर पण कुंपणाच्या बाहेर नाही.. 
एकेका पायरीवर बसू आपण कॉलेजला होतो तसे.. 
मी खालच्या पायरीवर आहे आणि तू अशा ठिकाणी जिथून तुला अजूनही टपली मारता येते मला , 
अगदी कॉलेजमध्ये मारायचीस  तशी !

पहाटे निघणार आहेच मी,
पण ही गप्पांची रात्र  संपूच नये असं वाटतं आहे.. 

मध्यरात्रीच्या पल्याड पण पहाटेच्या थोडं अल्याड  .. 
तुझ्या नवऱ्याला जाग येते , 
तो आपल्याला कॉफी करुन आणतो आणि स्वतः ही घेतो , 
पहिल्या sip ला आपण एकमेकांना पाहतो.. 
तू शिकवलं आहेस त्याला माझ्या सारखी कॉफी बनवायला , हे तुला मलाच  कळतं !!
मी तुला thank you म्हणतो ! 

तो तुला कुशीत घेऊन मला thank you म्हणातो  , नजरेतून ! 
अर्थात तुला ते कळत नाही , पण मला कळतं  तो का thank you म्हणतो आहे .. 
मीही खरंच खूप चांगलं काम केल्यासारखं स्वीकारतो  ते ,
कॉफी मग हलकासा उंचावत ..!

पहाटेला तांबडं उगवलं कि ,  मग  आपले हे सगळे एकमेकांचे
thank you घेऊन आपण सगळेच प्रवासाधीन होतो एका नव्या पहाटेच्या  ,
the storm which was brewing between us .. मागे ठेऊन !

अचानक लक्षात येतंच आपल्याला we did brew a wonderful कॉफी , didn't we ?

Sunday, May 17, 2020

​कधी कधी न? काहीच बोलू नये..



कधीकधी नं ? काहीच बोलू नये..
नुसत्या शांततेलाच थोडे बोलू द्यावे..
शांत , अगदी स्तब्ध राहून...
 हृदयात खुप काही हलू द्यावे ....

या शांततेत कधी मग,
पावसाला द्यावा थोड़ा चान्स ,
रिमझिम धुन ऐकत मग,
फुलू द्यावा अखंड रोमान्स ..

कधीतरी मग वारा ,
नुसताच वाहू द्यावा ,
अंगावरचा काटा मग
तसाच राहु द्यावा ...!

आधीच कललेल्या उन्हाला ,
थोडं अजुन कलू द्यावं  
वाट पहायचं दु:ख मग,
थोड अजुन सलू द्यावं !

पाहू द्यावं स्वप्न कधी 
उघड्या डोळ्यांना ,
अन दोन शब्द द्यावेत 
पापणीच्या चार कळयांना !

कधी हळुवार फुंकर घालून ,
मुठीतल्या म्हातारीला थोडं उडु द्यावं 
तर कधी प्रेमवेड्या सखीला,
घट्ट मिठीत मनसोक्त रडू द्यावं  ..

स्पर्शांचे  अर्थ मग 
श्वासांना कळु द्यावेत..
अर्थहीन श्वास मग 
वेड्या लयीत वळु द्यावेत ....!

कधी कधी हे सगळं घडेल
 असं स्वप्न पडू  द्यावं 
स्वप्नांत का होईना 
असं स्वप्नवत घडू द्यावं ..!

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...