Wednesday, April 24, 2013

॥ खळीकंस ॥तुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम  ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी
व्यथांचेच सारे  महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?

जरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,
कशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥

तुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,
खळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू  चंद्र खग्रास होतो ॥


फुलोनी  पहाटेस  प्राजक्त येता  ,मला  जास्त होते  धरेचेच  देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .

 सुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी  पालवी  ये  ..
 मला  सावराया तुझे हात येता ,उगा फार बेचैन  मग  श्वास  होतो..!

किती शेर लिहितो , किती दाद घेतो , उला छान होतो ,कडेलोट सानी!!
तुझे नाव येता तखल्लूस झाला , पुन्हा नाव माझे ,अनुप्रास होतो !!

Wednesday, April 3, 2013

विन्या म्हणे आता

विन्या म्हणे आता ,
बोलू नये काही 
कृतीच प्रवाही ,
होवो द्यावी ||

विन्या म्हणे आता 
घ्यावे सांभाळून
 जाणून बुजून 
नेणीवांना ||

विन्या म्हणे कर
कृती उपकारी 
कृष्णास बासरी 
नेओ द्यावी ||

विन्या म्हणे मन 
चंचल चपळ 
त्यास धावपळ 
करू द्यावी ||

विन्या म्हणे मना 
बांधू नये फार ,
जडतो आजार 
जोखडाचा ||

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...