Thursday, January 22, 2015

रांगोळी आणि फुल

तू
अगदी 'रांगोळी' सारखी आहेस
अनेक रंगी,
पाहिले की प्रसन्न वाटावे अशी ,
सगळ्यांचे स्वागत करणारी ,
अनेक आकारांतून आकर्षित करणारी
सणावारात ,त्या त्या सणाला,
तशी तशी होत जाऊन
सोबत करणारी ।
दिवाळीला कधी शांत संयत दिप बनुन
तर
वसंतपंचमीला चित्ताकर्षक रंगांनी भरून
तू नेहमी असतेस अगदी जवळपास माझ्या ..
मी ? मी कोण?
मी ते फुल ज्यात तुझे जवळपास सगळे गुण आहेत ।
पण
मी उधळला जातो आकाशात
उन्मुक्त विजयानंदात ,
मी प्रेमात मिरवतो ,
मी सखीच्या अंबाड्यात विसावतो ,
मी ओंजळीत भरून घेतला जातो ,
मी शैय्येवरती पसरला जातो ।
कुठल्याही उंचीवर ने मी त्या उंचीशी सामावुन घेतो |
पातळी सोडलीच मी तर ,
शेवटच्या प्रवासातहि सोबत येतो
अगदी पायाखाली दहा हात उतरून....
अन् तु?
"तुला पातळी चा शाप आहे,तु ती सोडु शकत नाहीस !
तु तुझी पातळी नाही ओलांडु शकत ,
नेहमी समांतर रहातेस,
आकाश आणि धरतीच्या मिलनरेषेला !"
यालाच मर्यादेचे नाव देऊन ,
तुला बंदिस्त केलं आहे एकाच पातळी वर आम्ही ।
विनायक ।

२२ जानेवारी २०१५

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...