Thursday, November 23, 2023

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो 

रात्र सायली होते , 

तुझिया अस्तित्वाने 

श्लोक-शायरी होते। 


मी धुनी पेटवत असता

तू यज्ञाचे मंतर गाते ,

मी अलख निरंजन म्हणतो

ते नातीचरामी होते ।


मी दृढनिश्चयी कैलासी 

तू भोगावती अवखळशी, 

मी सांब सदाशिव होता 

तू सती,शाम्भवी होते ।


मी अतिक्षोभी महाकोपी 

ब्रह्मांडा भस्म ह्या करतो, 

तू राख होऊन येते

देहाग्नी शांत निवविते ।


हे चक्र अनाहत आहे

अनंत कालौघाचे ,

मी पाठ दावी विलासी 

तू पाठ भोगां लाविसी ।


मी विनाशभैरवी गातो , 

तू सृजनाचे कूजन होते ,

मी प्रलयगीत संपवताना 

तुज प्रणयगीत प्रसवते ।।


विनायक

#vinayaki

#विनायकी

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...