Friday, August 23, 2013

घडलं-बिघडलं...!

तुला शेवटचं पाहिलं ..
तेव्हा काही घडलं नाही..
सगळं अगदी सुरळीत होतं..
कुठही काहीच बिघडलं नाही..

नंतर सहज लक्षात आलं ....
नेहमीसारखं या पोर्णिमेला 
अंगणात चांदण पडलं नाही..
पण तरीही वाटलं
कुठ काही बिघडलं नाही..

आणि हो..त्यादिवशी एकदा..
गुलाबाला पाणी देताना जाणवलं..
अरे हे रोप पुन्हा फ़ुललचं नाही..
पण तरीही वाटलं
छे कुठ काही बिघडलचं नाही..

रोज फिरायला गेल्यावर पाहतो..
घराजवळचं तळं आपलं
कमळांनी पुन्हा सजलचं नाही..
पण तरीही त्या तळ्याचं 
काहीही बिघडलचं नाही..

खिडकीतून डोक्यावल्यावर कळलं
या मोसमात गुलामोहारचं झाड 
पानां-फुलांसकट झडलं होत 
तरीही वाटलं नाही..
कुठं-काही बिघडलं होत..

तुला शेवटच पाहताना ..
मन माझ खूप रडलं होत..
पण कुणालाही कळलं नाही..
कुठंतरी..काहीतरी..बिघडलं होतं..

.................................विनायक
...............................१७/३/२००५

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...