Monday, August 10, 2009

नुसत्या अस्तित्वाने माझ्या..


मला एकदा वा-यासारखे जगायचे आहे..
कुणालाही न दिसता ..
नुसत्या अस्तित्वाने माझ्या..
या चराचराला जगवायचं आहे ..

मला एकदा चंद्रासारखे लपायचे आहे..
दर्शनही न देता स्वत:चे ..
नुसत्या अस्तित्वाने माझ्या ..
सुर्यालाही मागे लपवायचे आहे..

मला बनायचा आहे..अंधार अथांग..
न उगम .. न अंत.. अन तरीही..
नुसत्या अस्तीवाने माझ्या..
प्रकाशाला द्यायचा आहे थांग..!!!

..............................................विनायक...
..........................................२३/जून/२००५

Sunday, July 26, 2009

ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling



आताशा गाव सोडताना ..
वेगळे वाटायचे बंद झाले आहे..
पाउस तसाच भिजवतो सगळीकडे ..
उन्हं तापतात तशीच सगळीकडे..
आता एका गावातून दुसऱ्या  गावी पोहचताना ..
घरी परतल्यासारखे वाटते ..
मला कळत नाही ..!!

हे ज्ञानेश्वर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय ?

कर्म करताना फळाची अपेक्षा करू नको..

कृष्ण गेला सांगून ...माउली गेले लिहून ..
त्यांचं  सांगायला ..यांचं  रुपांतर करायला..काय जातं..?
असं जगायचं म्हणलं तर मरणं सोपं होतं...!!

आयला कळत नाही हे anti ज्ञानेश्वरी feeling कुठून आलंय?

जाणीवा सा-या जपताना .. नेणीवेचे प्रश्न उगाच..!!
माणसासारखं  जगताना देवासारखं  का वाटतंय ?
सगळं feel feel मध्ये उतरवलं मनातलं .
आता feelingless feel होतंय..
आता माणसापेक्षा वेगळं वाटतंय..
इथे वर हलके  वाटतंय ..!!

"अरे , माउली तुम्ही..?"
"बघ म्हणलं होतं न?
कृती कर .. प्रचीती येयील.."...

...............................................विनायक

Friday, July 17, 2009

भिजेल न ती?


अल्लड सर ..
अल्लड नजर..
अल्लड वय..
कशाचे भय?

झिम्माड तन..
झिम्माड मन..
झिम्माड पाणी..
येईल न राणी?

धुंद मेघ..
धुंद विजरेघ..
धुंद वाटा..
येयील न काटा?

चिंब वृष्टी..
चिंब सृष्टी..
चिंब मी
भिजेल न ती?

विनायक ....
१२/जुलै/२००९

कवितेला असं लागतच काय?


कवितेला असं लागतच काय?

हिरवं पान ..
हिरवं देठ..
अन भावुक सखिची गळा भेट..
थोड़ा पाउस
थोडंस उन ..
अन तिचा कटाक्ष हसून ..
फुललेलं फुल..
खुलणारी कळीं..
अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..
फेसाळती लाट..
अन तिच्या कुशितली पहाट.. .

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...