Tuesday, August 30, 2016

हि तेव्हाची गोष्ट आहे

हे
हि तेव्हाची गोष्ट आहे ,

जेव्हा माझ्या हाताच्या रेषांमध्ये तू बघत होतीस तुझं  भविष्य
अन मी तुझ्या गहि-या डोळ्यांमध्ये शोधत होतो माझं  आयुष्य  ..

जेव्हा लायब्ररीच्या मेजेवरती एका टोकाला तु असता काटा यायचा अंगावर . .
अन पुस्तकातला गुलाब फिदा व्हायचा तुझ्या गुलाबी रंगावर ।

हि तेव्हाची गोष्ट आहे ,

जेव्हा मोबाईल जळायचा हिशोबाच्या वातीवर . .
हिशोब मुद्दाम लिहायचा पुसल्या जाणाऱ्या  पाटीवर  ।

तू बोलणार उद्या याच दिवसभर  ओझं व्हायचं . ,
तू भेटली एकदा की सगळं जग माझं व्हायचं ।

हि तेव्हाची गोष्ट आहे ,

जेव्हा एक कॉफी दोघात घेऊन मिरवयाचो शेअरिंग वाल्या गप्पा ,
तुला कुठलं व्यसन नाही न ? तुझा एक फीअरींग वाला कप्पा !

भेटण्यासाठी कुठल्याश्या सुंदर जागेचं  सांगितलं नाव आठवतंय . .
सुंदर जागी ठरली भेट टळली होती हे आठवतंय !!

हि तेव्हाची गोष्ट आहे,

एक साळुंकी दिसल्यावर दुसरी शुभशकुन शोधत फ़िरायचो ,
अन आपण दोघे साळुंकीच्या जोडी सारखे दिसायचो,

वाढदिवसाला मुद्दाम ए ते झेड अक्षरांचं ग्रीटींग बनवायचो ..
अन त्यातल्या आय एल यु च्या जागी विशेष खुणा सजवायचो..

हि तेव्हाची गोष्ट आहे,

लायब्ररी गाठायचो अभ्यासायला उगाच कुठला सोपा विषय
तुझ्या कडुन समजाउन घ्यायचो त्यातला खोल आशय !!

आशय समजावून घेताना एक आठवणींचं पिंपळपान ठेवलं होतं
त्या पानावरच्या जाळीसारखं आयुष्यगान जपलं होतं,

आपलं नातं त्या जाळीसारखं सुबक,नाजुक होत जीर्ण व्हायला हवं
तुझ्या माझ्या गोष्टींनं तेव्हाच्या.. आता पुर्ण व्हायला हवं!!

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...