Monday, October 10, 2016

तुझी माझी भेट !!तुझी माझी भेट ठरली आहे ..
आणि भेटायच ही तसं पक्कं आहे..
लक्षात ठेव..
कुणी सांगितले की,
सात फ़े-यात सात जन्म आहेत म्हणुन?
आपली भेट त्या फ़े-यातली नाहिच..
खरे तर कुठल्याच फ़े-यातली नाहि..
जन्मा मृत्युच्या ही नाहि..
खरे तर सात मोजायचे कसे अन कुठुन?
प्रत्येक वेळी पहिल्यांदा भेटतो न आपण?
हि धर्मा-कर्मा ची बंधने फ़क्त या जन्मात आहेत ,
हे लक्षात ठेव..
फ़क्त देहाच्या मागण्या दिसतात जगाला..
अन त्यासाठी देवा-धर्माला बनवुन..
त्यात भल्या बु-याची भर टाकुन,ग्रंथ लिहिलेत..
कुठल्याच ग्रंथाने मनाची बाजु नाहि मांडली..!
प्रत्येक धर्म मन मारुन अनेक मागण्या करतोय..
या यज्ञात हे सारंच भस्मसात करायचं आहे..
त्यात तुझी-माझी समिधा पडायलाच हवी..
लक्षात ठेव..
प्रत्येक वेळी मी नव्याने येतो..
तुझ्या शरीरात शिरतो..मग जळुन खाक होतो..
अन तुला तुझं तरी आठवंत का की तु कधी
जळाली नाहिस या सगळ्यात ..?
आपण एकत्र आल्यावर यज्ञ असतो देहांचा ,
कुठे ?कोण जळतं ? हे समिधांना कळतं कुठे?
माझ्यातुन वेगळी केली तर तु राख अहेस ..
लक्षात ठेव..
या जन्मात श्वासांनी मागणी केली ..
म्हणाले ,तु भेटली तर आम्ही सोडुन जाउ ..
मी सगळ्यांची मागणी पुर्ण करण्याचं ठरवलं आहे..
तुला भेटणार आहे ...अन श्वासांना मुक्त करणार आहे ..
तुला भेटल्यावर तसा ही त्यांचा उपयोग नाहि ..
किंवा तुझ्या श्वासांची परतफ़ेड करुन त्यांना परत घेउ..
ही देवाण घेवाण कशी करायची..अन त्यानंतर उरणार काय ?
हा प्रश्न ही तुला सोडवायचा आहे..
लक्षात ठेव..
हे प्रश्न-उत्तर..खरे-खोटे...आत्मा-परमात्मा..
देव-मानव,चांगलं-वाईट,तुझं-माझं...
आकाश-प्रकाश,बरे-बुरे,चुक-बरोबर..
या सगळयांच्या पार आपण भेटणार आहोत..
जिथे धर्मा-कर्माच्या ,देवा-मानवाच्या मागण्या नसतील..
इतकेच काय देहाच्या ,श्वासांच्या मागण्या नसतील..
कारण हे सगळं सगळं खोटं आहे..
फ़क्त तुझी-माझी भेट तेवढं शाश्वत सत्य आहे ..
हे लक्षात ठेव..

विनायकNo comments:

Post a Comment

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...