दिवसभर फिरून मळलेल्या या सूर्याला ..
एकदा न्हाऊ माखू घालून..
कुठल्याशा समुद्रात सचैल स्नान करवून
पाहत रहावं एक तीट लाऊन ..
चंद्रही बिचारा दिसतोय केविलवाणा ...
कधी पासून खोटे आरोप सांभाळून कृष्णा-गजाननापासून ..
सारे डाग टाकावेत त्याचे एकदा पुसून..
अन त्यालाही टाकावं चमकवून ..
वामकुक्षी घेतायत वारे सारे ..
दूर पर्वत रांगात विसावून ..
त्यांना आणायला हवं उठवून ..
अन ठेवायला हवं पुन्हा वृक्षराजीत डांबून ..
ऐकून युद्धाचे बिगुल ..
तान्ही उठताहेत दचकून ..
एक शांती संदेश पाठवून ..
टाकायला हवं सारं संपवून ..!!
ती आल्यापासून या जगात
सारंच वाटत आहे जुनाट ...
आंदण म्हणून मिळालेलं सारं..
चंद्र, सूर्य आणि हे वारं..
जुनाट ,नादुरुस्त अशा या दुनियेला
स्वच्छ करावं आता ..
अन लक्ख घासून पुसून ..
ठेवावं दुरुस्त करून ..!!
ती आल्या पासून ..!!
(अनुवादित )
मुळ रचना : निदा फाजली !
कवितेला असं लागतच काय?
हिरवं पान ..हिरवं देठ..अन भावुक सखिची गळा भेट..
कवितेला असं लागतच काय?
थोड़ा पाउस..थोडंस उन ..अन तिचा कटाक्ष हसून ..
कवितेला असं लागतच काय?
फुललेलं फुल..खुलणारी कळीं..अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..फेसाळती लाट..अन तिच्या कुशितली पहाट..
Wednesday, July 20, 2011
Tuesday, July 19, 2011
तर्पण

चितेवर तुझ्या ..,
कारण मला पक्कं ठाऊक होतं
तू मरणार नाहीस ..
तू मेल्याची खरी अफवा
उडवली होती कुणी तरी ..
खरेतर ,पिकलं पान होतं ते,
जे झडलं पानगळीत ..
माझे डोळे अजून अडकलेत
तुझ्या दूरदृष्टीत ..
ज्यातून अजून तशीच दिसते
सारी भल्या-बु-याची दुनिया ..
जशी तुला दिसायची !!
कुठे काहीच फरक नाही पडला ,
माझ्या बोटात अजून तुझीच ताकत आहे ,
लिहायला घेतो जेव्हा लेखणी हाती ,
तूच अवतरतेस माझ्या जागी !!
धमन्यातून जे वाहे ते तुझेच रक्त आहे ..
माझ्या सुरातून तुझाच नाद येत आहे ..
नालायकी माझी तुझ्या आवाजात गात आहे ..
लाचारी हा जुना रोग शरीरात वाहे ..
समाधीवर ज्याने नाव लिहिलं तुझं..
तो ठार खोटारडा बापुडा जीव आहे ..
तू माझ्या अंतरी अजून सजीव आहे ..
अन झालेच तर..
तर्पण माझे तुझ्या ओंजळीने व्हावे ..!!
.
.
विनायक ,
(अनुवादित )
मुळ रचना : निदा फाजली
Subscribe to:
Posts (Atom)
प्रलयगीत
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
चल आता सुरु करूत .. आपला नक्षत्रांचा प्रवास.. सापदलीच तर जिन्कुत सारी .. आणि करुयात त्यांची आरास.. मग आणखी दोघे चौघे येतील आपल्यामागे ...
-
दिवस मोगरा होतो रात्र सायली होते , तुझिया अस्तित्वाने श्लोक-शायरी होते। मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...
-
तुम मेरे क़िताब की , ना शुरुआत हो न तो अंतिम पन्ना, तुम बुकमार्क हो ! जिसे अंत या आरंभ से कोई फ़र्क नहीं पड़ता , जो सिर्फ ये सूचित करने ...