Tuesday, July 19, 2011

तर्पणमी मंत्राग्नी द्यायला नाही आलो 
चितेवर तुझ्या ..,

कारण मला पक्कं ठाऊक होतं 
तू मरणार नाहीस ..


तू मेल्याची खरी अफवा 
उडवली होती कुणी तरी ..
खरेतर ,पिकलं पान होतं ते, 
जे झडलं पानगळीत .. 


माझे डोळे अजून अडकलेत 
तुझ्या दूरदृष्टीत ..
ज्यातून अजून तशीच दिसते 
सारी भल्या-बु-याची दुनिया ..
जशी तुला दिसायची !!


कुठे काहीच फरक नाही पडला ,
माझ्या बोटात अजून तुझीच ताकत आहे ,
लिहायला घेतो जेव्हा लेखणी हाती ,
तूच अवतरतेस माझ्या जागी !!


धमन्यातून जे वाहे ते तुझेच रक्त आहे ..
माझ्या सुरातून तुझाच नाद येत आहे ..
नालायकी माझी तुझ्या आवाजात गात आहे ..
लाचारी हा जुना रोग शरीरात वाहे ..


समाधीवर ज्याने नाव लिहिलं तुझं..
तो ठार खोटारडा बापुडा जीव आहे ..
तू माझ्या अंतरी अजून सजीव आहे ..
अन झालेच तर..

तर्पण माझे तुझ्या ओंजळीने व्हावे ..!!

.
.
विनायक ,
(अनुवादित )
मुळ रचना : निदा फाजलीNo comments:

Post a Comment

गोष्ट असेल छोटीशी ..

गोष्ट असेल छोटीशी .. पण त्याचीही कथा करतील.. तु सुस्कारे सोडशील साधे.. लोक त्याचीही गाथा करतील ..१ शिस्तभंगाचे कलम लागेल तुझ्या बटांना ......