Wednesday, July 20, 2011

ती आल्या पासून ..!!

दिवसभर फिरून मळलेल्या या सूर्याला ..
एकदा न्हाऊ माखू घालून..
कुठल्याशा समुद्रात सचैल स्नान करवून
पाहत रहावं एक तीट लाऊन ..

चंद्रही बिचारा दिसतोय केविलवाणा ...
कधी पासून खोटे आरोप सांभाळून कृष्णा-गजाननापासून ..
सारे डाग टाकावेत त्याचे एकदा पुसून..
अन त्यालाही टाकावं चमकवून ..

वामकुक्षी घेतायत वारे सारे ..
दूर पर्वत रांगात विसावून ..
त्यांना आणायला हवं उठवून ..
अन ठेवायला हवं पुन्हा वृक्षराजीत डांबून ..

ऐकून युद्धाचे बिगुल ..
तान्ही उठताहेत दचकून ..
एक शांती संदेश पाठवून ..
टाकायला हवं सारं संपवून ..!!

ती आल्यापासून या जगात
सारंच वाटत आहे जुनाट ...
आंदण म्हणून मिळालेलं सारं..
चंद्र, सूर्य आणि हे वारं..

जुनाट ,नादुरुस्त अशा या दुनियेला
स्वच्छ करावं आता ..
अन लक्ख घासून पुसून ..
ठेवावं दुरुस्त करून ..!!

ती आल्या पासून ..!!


(अनुवादित )
मुळ रचना : निदा फाजली !

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...