Thursday, January 16, 2014

एकसंध



मला हिमालयात जाउन ऐकायचा होता आवाज ,
एकसंध बर्फ तुटल्याचा , 
किंवा कन्याकुमारीत समुद्राची गाज एकसंध असते म्हणे !
झालंच तर
नायग-याचा प्रपात ही ऐकायचा होता ,तो हि एकसंध असतो म्हणे !
खूप खोल प्रशांत महासागराच्या तळाशी 
भूगर्भाचा आवाज येतो म्हणे एकसंध !!

मला पक्क ठाऊक आहे की कृष्णविवरात 
एकसंध आवाज आहेत फक्त ,
मीच तयार केले आहेत हे सारे आवाज 
उगमापासून अंतापर्यंत,
एकसंधसे !

आता सुटलोच आहे तर .  . . 
पाय मोकळे करून यावे म्हणतोय विटेवरून निघून !! 
आणि अनेकांच्या प्रार्थनेत लुप्त झालेली 
एकसंधता शोधावी म्हणतोय !


_ विनायक !

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...