Saturday, January 18, 2014

समज !



कृष्णा ,
मी समजू शकतो तुझी अवस्था आज !
जेव्हा लक्षात येतं 
कंठशोष करून  शंख तर फुंकायचा आहे आपणच , 
आणि लढायचं पण नाही ,
तसंच ,
मला आलंय लक्षात ,
सखा सखा म्हणुन आयुष्यभर सोबत असलेल्या माणसाने 
अचानक पाठ दाखवण्याचे प्रसंग झेलले ,
की गीता आपोआप झरु लागते बघ !
शिशुपालीय वृत्तींना ठेचावं लागतं 
अगदी भर सभेत,
हेही नीट कळलंय मला !
राधेला बासरी दॆउन भुलवत मार्गी लावण्याची
निकडही मी समजु शकतो . . !
पुन्हा गोकुळात न जाण्याचा निग्रह 
मी बाणवला आहे अंगी
अगदी समजावून घेऊन !
केसात हात घातला तेव्हा न येता 
पदरास हात लावताच येण्यातला उशीरहि 
मी समजाऊन घेतला आहे आपसुक !
पण 

कर्णाला द्रौपदी देऊ करणं अजूनही मी समजू शकलो नाहि 
अनेक अक्षौहिणी सैन्य  उध्वस्त करुनसुद्धा !!!!

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...