Sunday, March 2, 2014

इथे फार झाल्या कविता वगैरे !!

जरा फुल टाकू , जरा पान फ़ॆकु ,
सुर्याला म्हणुया सविता वगैरे !!

वृत्त आणि वृत्ती तमाशे नव्याने
नव्याने वाहुदया सरिता वगैरे !

कमेंटा कमेंटा लगे आग लागे
नको ग्रामराचा पलिता वगैरे !

भुजंगप्रयाता चला थोडे हिणवू ,
लिहूया सिंहविलोकिता वगैरे !

चला दूर जाऊ , नवा ग्रुप काढू ,
इथे फार झाल्या कविता वगैरे !!

पुन्हा इथे येऊ , पुन्हा पोस्ट टाकू ,
सहनशील आहे संहिता वगैरे !


विनायक !


तळटीप :

______ हि एक प्रचंड काव्यमय स्वातंत्र्य घेतलेली कविता आहे ,
गझल करण्याच्या फंद्यात खुद्द कवी पडला नाही ,
इतरांनी हि प्रयत्न करू नये !!
आणि हो शेवटच्या ओळी (खरे तर आक्क्खी(?) कविता ) वैभव जोशी यांच्या प्रचंड फ़ेमस
कवितेच्या / गझलेच्या जवळ जातात ,
पण आपण त्यांची माफी मागणार नाही ,
कारण इतकं काही वाईट केलं नाही मी त्या कवितेचं !!
बरं काही ओळी तर एकदम अभ्यास पूर्ण लिहल्यात !!

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...