Tuesday, March 18, 2014

समानता


माझ्या इतक्या कामाचे
माझ्या इतके पैसे घेते ,
माझ्या सोबत ऑफिसात यॆउन ,
माझ्या सोबत  निघुन जाते ,

माझ्या इतक्या सुट्ट्या
माझ्या इतक्या बुट्ट्या
माझ्या इतकी हाइक
अन माझ्या सारखी बाईक ,

माझ्यासारखा बॉस तिला
अन त्याचा माझ्यासारखा त्रास तिला ,
कधी आनंदाने गाणे गाते
माझ्यासारखी शीळ मारते ,

विचारात घेतले जाते
मीटिंगमध्ये  तिचे प्रत्येक मत
तिच्या मतालाही ओवर द टेबल
माझ्या मता इतकीच  पत

तिच्याइतकि भुक मलाही ,
तिच्याएवढी दमणुक मलाही ,
तिच्यासारखा माणूस मी
अन माझ्यासारखी मानव ती

तरी बसमधल्या खुर्चीला  मी घाबरतो
माझ्या दमणुकिला मी समजावतो
हॉटेलातल्या family only शी घुटमळतो
पोटातल्या भुकेला समानतेने पिटाळतो !



विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...