Friday, September 19, 2014

आनंद

मध्ये एका रानवेडयाची शोधयात्रा  या सुंदर पुस्तकात एक छान वाक्य होतं "एक पुर्ण ऋतुचक्र एका जंगलात घालवायची इच्छा होती ती पुर्ण झाली".
मला असा विचार आला कि आपली अशी एखादी इच्छा देवाने पुर्ण करायची म्हटले तर आपण काय म्हणु ? लगेच माझ्या फ़िल्मी मनाने उत्तर दिले सुद्धा ! "एक पुर्ण फ़िल्म तिची कथा निर्मात्याला /दिग्दर्शकाला ऐकवली गेल्यापासुन रीलीज होयीपर्यंत अनुभवायची आहे आणि फ़िल्म कोणती तर तेहि उत्तर लगेच आले : "आनंद" !!
मागे रणजीत ने उत्तम लेख लिहला त्यामुळे तेव्हापासुन डोक्यात आनंद होता ,
( अर्थात मनात कायम असतो तेव्हा सक्काळी सक्काळी डोक्यात गेला. :) )
रणजीत ने अप्रतीम लेख लिहला आहे ज्यात त्याने फ़िल्म  चा दर्शनी भाग कव्हर केला आहे ,
 पण माझी खात्री आहे पडद्यामागेहि बरेच काहि  अप्रतीम असे काहि घडले असणार नक्कि .
पडद्यावर जरि कायम मृत्यु चे सावट असले तरि या लोकांनी धमाल केली असेल पडद्यामागे , जबरद्स्त केमिस्ट्री असणार सगळ्यात हे नक्की त्याशिवाय इतके अप्रतीम सादरीकरण झाले नसते, असे सगळे क्षण अनुभवायला मिळायला हवे होते . आणि याची प्रचिती रात्री कौन बनेगा बघताना आली .
बच्चन सांगत होता कि शेवटचा सीन ज्यात तो हमसुन हमसुन रडतो त्यात तो हसत होता म्हणे खरे तर !!
देवा, एक रोल दे रे! या फ़िल्म मधला अगदि दारासिंग ज्या पाप्याच्या पितराला उचलुन फ़िरवतो तो रोल पण चालेल !
किंवा इसाभाइच्या रीहर्सल मध्ये त्याच्या बाजुला उभे असणारे मक्ख चेहर्याचे शिपाई पण चालेल !

"इसे कविता कि किताब मे रखुंगा , जैसे कविता एक बिते पल कि निशानी होती है , वैसे ये फ़ुल एक बिते पल कि निशानी बनके रहेगा !"

"मै एक भी शर्त नही हारा हु !
हमारे लिये क्या खाली खुर्सिया बजेगी ?

क्या करु गुरुदेव मेरे तो डायलॉग हि खतम हो गये !

अल्ला करे ये शर्त रघुकाका  जीत जाये !

काय संवाद आहेत एक एक  .

आता पुन्हा आनंद बघाताना हे पोस्ट करतोय .

दुस-या मौत तु एक कविता है नंतर .......... !

आनंद मरा नहि आनंद मरते नहि !

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...