Friday, September 19, 2014

Phonetic Vs Photographic


नुकतंच एक मित्र म्हणाला कि, " तुझी  memory phonetic आहे ,
म्हणजे photographic नाही "
"म्हणजे ?"
"म्हणजे बघ आमुक आमुक दिवशी ,
तमुक तमुक व्यक्तीने काय रंगाचा शर्ट घातला होता ?
हे तुला आठवत नाही
पण तेच तमुक तमुक प्रसंगात
अमुक एक व्यक्ती काय बोलली होती ?
हे तुला आठवत
एकदम स्पष्ट ! हो न ?"

हम्म .....

तरीच तू शेवटचं  भेटली तेव्हाच्या एक दिवस आधीपासुन
सगळे आवाज आठवतात मला ,

तुझा मेसेज आला तेव्हा मेसेज टोन काय होता ते आठवतं ,
मेसेज येण्या आधी तो जुना फोन किंचित किनर्या आवाजात
लाईट फेकायचा ते आठवतं ,

भेटण्याच्या दिवशी शुभ्र पांढर्या रंगाच्या तुझ्या ड्रेस मध्ये येताना
नेहमी सारखी जीन्याला धरून गिरकी घेताना
आपल्या जुन्या कॉलेजचा  लाकडी जीना कुरकुरला  होता ,

"हाय हिल घातली की ग्रेसफुल चालावं लागतं" म्हणायचीस ना ?
तू येताना तुझ्या ग्रेसफुलनेस चा आवाज नवे हाय हिल्स सांगत होते

जवळ येउन, अगदी जवळ येउन  उभारलीस तेव्हा
तेव्हा इतक्या तरल स्पर्शाना पण  आवाज असतो हे कळलं

हृदयाच्य धडधडीचे चे आवाज होते तेही अगदी स्पष्ट आठवतात
ठोक्यांचे  ताल  तुझे वेगळे आणि माझे वेगळे अगदी स्पष्ट आठवतात मला ,

तुझ्या निळ्या डोळ्यांना काय  म्हणायचं होतं ते ऐकू आलं होतं मला
आपल्या समोरच्या रोपट्यावर झालेली पानांची कुजबुज
आणि अनेक विस्फारलेल्या डोळ्यांचे मोठे आवाज अजूनही आठवतात मला .

मी " नाही " असं काही अस्पष्ट बोलल्यावर काचेला  तडा गेल्याचा आवाज येतो तसा
आवाज आला , त्यातला पारा वाहतो तसा एक आवाज आला

हे सगळे phonetic क्षण photographic रित्या टिपले आहेत मी ,
फक्त एकच सांग … .

एक मोठा दगड बांधून समुद्राच्या तळाशी मनाला सोडुन दिलं तर
 समुद्र तळापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक  आवाज येतात ,
आणि तिथे पोहचल्यावर तिथल्या शांततेचा एक आवाज येतो ,

मला भेटली पुन्हा कधी तर
माझ्या हसण्यातला  तेवढ्या शांततेचा phonetic sound
photographic करून कोरून घे
पुढच्या अनेक जन्मात आपल्याला ती मेमरी  हवी आहे !! 

No comments:

Post a Comment

कमीनी कौम

देवा, डॅडु कसे आहेत रे आता देवाआनंद बरोबर बसले असतील न हसत ? किंवा तुरा त्याचा जवळुन आहेत बघत ? आठवत का देवा तुला किती उपास तपास ...