Tuesday, January 30, 2018

कवी व्हायला असं लागतंच काय ..?

छोटीसी बाग ..
कौलारू घर ..
अन प्राजक्तसडा बाग भर ..!!

जोराचा पाउस ..
दोस्तांची जोडी..
अन जोडीने सोडलेली होडी..!!

कवी व्हायला असं लागतंच काय ..?

निळा समुद्र ..
हिरवी जमीन ..
अन गुलाबी मैत्रीण ..!!

झालेली पुनर्भेट..
न झालेला समेट..
अन एक कटाक्ष तिचा थेट..!!

कवी व्हायला असं लागतंच काय?

स्वच्छ हाथ ..
नशिबाची एक रेघ..
अन हातात नसलेला नशिबाचा वेग,,!!


परतीचा प्रवास..
रात्रीची वेळ..
अन अचानक सुचलेली ओळ ..!!

कवी व्हायला असं लागतंच काय?

कटू सत्य..
बाहेरचं वास्तव ..
अन आत भडकलेला विस्तव ..

पोखरलेला समाज..
सात्विक संताप..
अन आपल्याच लोकांचे प्रताप..!!
.
.
विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...