Tuesday, January 30, 2018

तीचा भास होता अजून ठोका चुकतोच न?



तीचा भास होता अजून ठोका चुकतोच ?
आणि आत कुठेतरी एक झोका झुलतोच ना ?

फुग्यांच्या लाल रंगास हसलो उगाच जरी ..
ती आठवता मनी तसा गुलाब फुलतोच ना ?

ओठांत डकवले तुफान हास्य चार जणांत
तरीही एकांतात 'तो' काटा सलतोच ना ?

झटकला विचार कधी जरी उगाच क्षणभर ..
तरी इतर क्षणात तो विचार उरतोच ना ?

विनायक

No comments:

Post a Comment

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...